मी, बण्डा जोशी

बण्डा जोशी
  • दूरदर्शनच्या ‘पुणेरी पुणेकर’, ‘नाट्यवल्लभ’, ‘बालचित्रवाणी’, ‘कंट्रीवाईड क्लासरूम’, ई टीव्हीच्या ‘हास्यरंग’, साम वाहिनीच्या ‘नववर्ष २०११’ इ. कार्यक्रमात सहभाग.
  • आकाशवाणी पुणे केंद्राचे सुप्रसिद्ध माजी निवेदक व कार्यक्रम निर्माते. ‘सुप्रभात’, ‘अस्सल’, ‘हसावसंची’ हे रेडिओवर गाजलेले कार्यक्रम.
  • ठाणे साहित्य संमेलनात गाजलेले हास्यकवी. ‘ऑफिस’, ‘संवाद’ पुस्तके व ‘खळखळाट’ काव्यसंग्रह प्रकाशित.
  • केसरी, लोकमत, प्रभात आणि पुण्यनगरीसाठी २० वर्षे नाट्यसमीक्षण.
  • नाट्यसमीक्षणासाठी ‘माधव मनोहर पुरस्कार’.
  • ‘हास्यपंचमी’ आणि ‘खळखळाट’ या एकपात्री कार्यक्रमांचे शेकडो प्रयोग.
  • सारांश — हास्यकवी, लेखक, नाटक, रेडिओ व टीव्ही कलाकार, नाट्यसमीक्षक आणि ख्यातनाम एकपात्री प्रयोगकार.
  • देश व विदेशात ५,००० पेक्षा अधिक प्रयोग करण्यात आले आहेत.
  • मराठीतील विनोदी विडंबनकार,हास्यकवी म्हणूनआचार्य अत्रे पुरस्कार,विनोदी एकपात्री कलाकार म्हणून पु.लं.देशपांडे पुरस्कारांसह,५० हून अधिक पुरस्कार व मानसन्मान.
  • प्रख्यात साहित्यिक कै.पु.ल.देशपांडे यांच्या विनोदी शैलीत साहित्यलेखन स्पर्धेत जागतिक स्तरावरील पुरस्काराचे मानकरी.
  • अखिल भारतीय नाट्य परिषद,पुणेआणि मुंबई या दोनही संस्थांकडून 'सर्वोत्कृष्ट एकपात्री कलाकार'म्हणून दोन पुरस्कार
  • वृत्तपत्रातील उत्कृष्ट नाट्यसमीक्षक म्हणून कै.दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
  • देशविदेशात अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन आणि नाट्यसंमेलनांसह अनेक व्यासपीठांवर गाजलेले विनोदी कवी आणि एकपात्री हास्यकलावंत.
  • हास्यपंचमी' या विनोदी एकपात्री कार्यक्रमाचे देशविदेशात विक्रमी पाच हजारांहूनही अधिक प्रयोग.
  • साहित्य,नाट्यआणि सुगम संगीत गायनविषयक अशा युवा स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर शंभराहून अधिक पारितोषिके मिळवणारा कवी,लेखक,गायक आणि सूत्रसंचालक.एक हरहुन्नरी कलाकार.
  • प्रकाशित साहित्यः १.स्वच्छंद(कवितासंग्रह) २.हसण्यास कारण की--(विनोदी कथा आणि लेखसंग्रह) ३.'खळखळाट'--(विनोदी कविता आणि विडंबनगीतांचा संग्रह)
  • आकाशवाणी पुणे केंद्रामधे निवेदकआणि कार्यक्रम निर्माते म्हणून १९८२ते २००३अशी सलग एकवीस वर्षांची कारकीर्द.रेडिओवर विशेष गाजलेले कार्यक्रम: सुप्रभात,हसवाहसवी, आरसा,लोभ असावा इत्यादी
  • महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेत'कार्यवाह' म्हणून प्रदीर्घ कारकीर्द.
  • अनेक साहित्यिक,सांस्कृतिक व सामाजिक संस्थांच्या उपक्रमांमधे सातत्याने महत्त्वाचा सहभाग.